Omicron: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले ओमिक्रॉन व्हेरिएंटवर लस किती प्रभावी

0

जालना,दि.३: कर्नाटक (Karnataka) राज्यात ओमिक्रॉन (Omicron) या प्रकाराचे 2 बाधित आढळले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात महाराष्ट्रात एकूण 28 ओमिक्रॉन संशयित रुग्ण सापडल्यानं ही डोकेदुखी आणखीनच वाढली आहे. त्यातील 10 संशयित हे एकट्या मुंबईतील आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यातील जनतेला कळकळीचे आवाहन केलं आहे. तसंच, ओमिक्रॉन व्हेरियंटवर लस किती प्रभावी आहे. याचीही माहिती त्यांनी दिली आहे.

कर्नाटकातील परिस्थितीवर मी भारत सरकारचे आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांच्याशी बोललो असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन पेशंट बाधित असून त्यापैकी एक चांगल्या स्थितीत आहे तर एक रुग्णालयात दाखल आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. जवळपास 30 पेक्षा अधिक देशात ओमिक्रॉनचे रुग्ण सापडत आहे. याचा संसर्गाचा वेगही जास्त असला तरी कुणी गंभीर आजारी नसून ऑक्सिजन किंवा इतर त्रास नाही व मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. ही जमेची बाजू आहे, अशी दिलासादायक माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

या विषाणूची संसर्गाची क्षमता खूप जास्त असल्याने लसीकरण करून घेणे फार आवश्यक आहे. कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी या व्हेरियंटवर उपयुक्त असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. अँटिबॉडीजना हा कोरोना व्हेरिअंट भेदू शकत नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, कारण ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य आहेत त्यामुळं म्हणून सर्वांनी लसीकरण करू घेण्याचे विनंती वजा आवाहन देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here