उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या शिबीरात 108 वाहनचालकांची आरोग्य तपासणी

0

सोलापूर,दि.23: उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उपाययोजनेअंतर्गत परिवहन वाहने व प्रवासी बस वाहने, तसेच शालेय बस वाहनांच्या वाहनचालकांची आरोग्य व नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात 108 वाहनचालकांची आरोग्य व नेत्रतपासणी करण्यात आली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूरमार्फत रस्ता सुरक्षा अभियानातर्गंत मोफत नेत्र तपासणी , चष्मा वाटप व आरोग्य तपासणी शिबीर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर येथे आयोजीत करण्यात आले होते.

वाहनचालकांची आरोग्य तपासणी

वाहनचालकांची आरोग्य तपासणी

सदर शिबीरात 108 वाहनचालकांची आरोग्य व नेत्रतपासणी करण्यात आलेली असून, 80 चष्म्याचे वितरण करण्यात आलेले आहे. यात मे. हेडसन्स फार्मास्युटिकलचे डॉ. आरीफ तडमोड, समीर तडमोड व छत्रपती सर्वोपचार शासकीय रुग्णालयाचे नेत्रविभागाचे खजूरकी व नदाफ अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य तपासणी शिबीरात सहभागी झालेल्या वाहनचालकांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच सहभागी वाहनचालकांचे रस्ता सुरक्षा नियम व वाहतूक नियमांबाबत समुपदेशन करण्यात आले. सदर शिबीराच्या धर्तीवर सीमा तपासणी नाका तसेच टोलनाके या ठिकाणी वाहनचालकांसाठी आरोग्य व नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी यावेळी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here