जेरुसलेमच्या अल-अक्सा मशिदीत हिंदूंविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण, पाकिस्तानला हल्ला करण्याचे आवाहन

0

दि.13: प्रेषित मोहम्मद यांच्यावरील भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून पॅलेस्टाईनमध्ये आता निषेधाची आग पेटली आहे. अल अक्सा मशिदीत हिंदूंच्या विरोधात रॅली काढण्यात आली. या रॅलीत हिंदूंविरुद्ध जिहाद पुकारण्याची हाक देण्यात आली.

जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीमध्ये 10 जून रोजी प्रेषित मोहम्मद यांच्यावर भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हिंदूविरोधी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

द मिडल ईस्ट मीडिया रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (एमईएमआरआय) अहवालानुसार, अल-अक्सा मशिदीतील रॅलीदरम्यान पॅलेस्टिनी इस्लामिक स्कॉलर निधाल सियाम यांनी गायींची पूजा करणाऱ्या हिंदूंविरुद्ध जिहाद सुरू करण्याचे आवाहन केले.

भारताच्या शेजारी देश पाकिस्तानचा उल्लेख करून ते म्हणाले की, पाकिस्तानकडे हिंदूंना धडा शिकवण्यासाठी सक्षम लष्कर आहे.

इस्लामिक इस्लामिक स्कॉलर निधाल सियाम म्हणाले, “आम्ही अल अक्सा मशिदीतून मुस्लिमांच्या सैन्याला संबोधित करत आहोत. इजिप्त, तुर्की, जॉर्डन आणि सर्वच मुस्लिम देशांना आम्ही विचारतो, की तुम्ही कुठे आहात? तुमचा धर्म आणि मोहम्मद पैगंबरांना पाठिंबा देण्याची हीच खरी वेळ नाही का? आपल्या देशांना स्वतंत्र करण्याची हीच योग्य वेळ नाही का? पाकिस्तानी नागरिकहो, इतर कुठल्याही देशापेक्षा, हिंदूंचा सामना करण्याची तुमची जबाबदारी अधिक आहे.

या व्हिडिओमध्ये मुस्लिम देशांना हिंदूंच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये इस्लामिक स्कॉलर सियाम म्हणाले, अमेरिकेने सर्वप्रथम इराक आणि अफगाणिस्तानवर हल्ला केला. यानंतर स्वीडनने मुस्लिम मुलांचे अपहरण केले. फ्रान्सने हल्ला केला. रशियन लोकांनी अनेक वेळा हल्ले केले. त्यानंतर चीनने गुन्हे केले. आता गायींची पूजा करणाऱ्या हिंदूंनी मशिदी उद्ध्वस्त केल्या. त्यांनी मुस्लिमांना मारून त्यांची गावे उद्ध्वस्त केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here