इंदापूर,दि.9: राज्यातील विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहेत. इंदापूरमध्ये भर चौकात हर्षवर्धन पाटील व शरद पवार यांच्या एकत्रित बॅनरने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बॅनर वर इंदापूर तालुक्याच्या जनतेची झाली तयारी हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी अशा आशयाचा मजकूर असल्याने हर्षवर्धन पाटील नक्की शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार यावर शिक्कामोर्तब झाले की काय ? अशी चर्चा रंगली आहे.
शनिवारी (दि.7) हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेताना प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की मी सध्या भाजपमध्येच आहे व दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही परंतु लगोलग रविवारी (दि.8) शरद पवार यांच्याबरोबरच्या बॅनर वरील फोटो बरेच काही सांगून जातो आहे. यावर दोन्ही नेत्याकडून काय तोडगा निघतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.