Hair Loss : कोणत्या कारणामुळे केस गळतात? केस गळतीवर करा हे उपाय

0

Hair Loss : अनेकांचे केस (Hair Loss) गळतात. सततच्या केस गळतीमुळे डोक्यावरील जास्त केस गळून जातात. हिवाळ्यात (Winter) केस गळण्याचे (Hair Loss) प्रमाण जास्त असते. थंडीच्या दिवसात अनेकांचे केस (Hair) खूप गळतात. हिवाळ्यात केस गळू लागण्याची कारणं आणि त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय (Hair Care Tips) करावेत, याविषयी जाणून घेऊया. हिवाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि त्यांना पुरेसे पोषण मिळण्यासाठी खाली दिलेले पाच उपाय (Hair Care Tips) करता येतील.

पुरेशा पोषणाच्या कमतरतेमुळं केसांची गळती सुरू होते. याशिवाय तणाव, ॲनिमिया, केसांवर वेगवेगळ्या केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर, विटामिन ‘बी’ची कमतरता, प्रथिनांची कमतरता, हायपो थायरॉइडिझ्म, केसातील कोंडा, जास्त क्षारयुक्त पाण्यानं केस धुणं, अनुवंशिक कारणं, केसांच्या मुळांना जंतुसंसर्ग (infection) या कारणांनीही केस गळू लागतात.

अनेक कारणांमुळे केस गळू (Hair Loss) शकतात. केस गळण्याचं कारण शोधून त्यावर योग्य उपचार करणं अत्यंत गरजेचं असतं. केसांची गळती कमी होण्यासाठी हे पाच उपाय करून पहा.

नारळ – केसांना योग्य पोषण मिळण्यासाठी नारळ वेगवेगळ्या प्रकारे फायदेशीर ठरतो. खोबरेल तेल थोडं गरम करून केसांच्या मुळांना मसाज केल्यामुळं केसांना पोषण मिळतं आणि ते मजबूत होतात. हे तेल कमीत कमी एक तास केसांना लावून ठेवावं. याशिवाय केसांना नारळाचं दूध लावून मसाज केल्यानंही केस मजबूत होतात. नारळाचं दूध केसांना लावल्यानंतर एक तासानं केस धुवावेत.

जास्वंद – जास्वंदीची लाल फुलं केसांसाठी वरदानच आहेत. हे फूल बारीक वाटून खोबरेल तेलात मिसळून केसांना लावून एक तास ठेवावं. त्यानंतर केस धुवावेत. यामुळं केसातील कोंडा कमी होऊन केस मजबूत आणि चमकदार होतात.

अंडी – अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, झिंक आणि सल्फर असतं. ही सर्व पोषक तत्त्वं केसांना मजबुती देतात आणि केसांची गळती रोखण्यास उपयुक्त ठरतात. अंड्यातील पांढरा भाग ऑलिव ऑइलमध्ये मिसळून केसांना मसाज करावा. यानंतर अर्ध्या तासानं केस धुवावेत.

कांदा – कांद्याचा रस केसांची गळती कमी करून लांब केस मिळवण्यासाठी फायदेशीर असतो. तसंच यामुळे नवीन केस उगवण्यासही चांगली मदत होते. आठवड्यातून दोन वेळा कांद्याचा रस केसांना लावून अर्ध्या तासाने केस शाम्पूने धुवावेत.

लसूण – लसणामध्ये सल्फर असल्याने लसूण केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. खोबरेल तेलात लसूण कडवून किंवा लसणाचा रस काढून तो खोबरेल तेलात मिसळून लावल्याने केसांना खूप फायदा होतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here