Hair Care Tips: स्वयंपाकघरातील या एका वस्तूमुळे पांढरे केस होतील काळे, वापरायलाही आहे खूप सोपे

0

दि.20: Hair Care Tips : पांढऱ्या होणाऱ्या केसांमुळे (White Hair) अनेकजण हैराण होतात. केसांना अनेकजण डाय (Hair dye) लावतात. वाढत्या वयानुसार केस पांढरे (White Hair) होणे सामान्य आहे. काहीवेळा लोकांचे केस लहान वयातच पांढरे होऊ लागतात. अशा परिस्थितीत केस काळे करण्यासाठी त्यांना डाय करावा लागतो. काही लोक शाम्पूपासून साबणापर्यंत सर्व नैसर्गिक वापरतात, मग केस काळे करण्यासाठी रसायनयुक्त पदार्थ का वापरायचे. तुम्हालाही नैसर्गिक (Natural) पद्धतीने पांढरे केस काळे करायचे असतील तर हा घरगुती (Home Remedies) उपाय फक्त तुमच्यासाठी आहे. केस काळे करण्यासाठी सर्वात प्रभावी स्वयंपाकघरातील पदार्थ म्हणजे चहापत्ती. चला जाणून घेऊया चहापत्तीने केस कसे काळे करावे.

चहापत्तीने पांढरे केस काळे करणे | Tea for Dying White Hair

पांढरे केस काळे करण्यासाठी काळी चहापत्ती गरम पाण्यात उकळा. तुम्ही सुमारे 7 चहाच्या पिशव्या किंवा 5-6 चमचे चहापत्ती घेऊ शकता. चहापत्ती किमान एक कप पाण्यात उकळा. आता ते डोक्याला लावा आणि 35-40 मिनिटे ठेवल्यानंतर कोमट पाण्याने केस चांगले धुवा. तुम्हाला तुमच्या केसांवर काळा रंग येण्यास सुरुवात झाल्याचे दिसेल.

चहापत्ती (Tea) प्रभाव आणखी थोडा वाढवण्यासाठी 2 चमचे चहापत्तीत 3 चमचे कॉफी (Coffee) घाला आणि एक कप पाण्यात सुमारे 15 मिनिटे उकळा. अर्धा तास केसांवर ठेवल्यानंतर डोके धुवा. हे तुमच्या केसांना गडद काळा रंग देईल.

लक्षात ठेवा की चहापत्ती लावल्यानंतर लगेच केसांवर शॅम्पू वापरू नका, कारण त्यामुळे केसांना योग्य रंग येणार नाही आणि जो रंग आला आहे तो देखील निघून जाईल.

सूचना: ही सामग्री, सल्ल्यासह, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here