Gunratna Sadavarte News: गुणरत्न सदावर्ते यांना मोठा दणका, वकिलीची सनद दोन वर्षांकरता निलंबित

0

मुंबई,दि.28: Gunratna Sadavarte News: वकिली गणवेशात आंदोलन करणं ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. (Gunaratna Sadavarte’s Lawyer’s License Suspended For Two Years) महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने ही कारवाई केली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी वकिली आचारसंहितेचं उल्लंघन करुन, वकिली गणवेशात आंदोलनात भाग घेतल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते आता दोन वर्षांसाठी कोणत्याही कोर्टात वकिली करु शकणार नाहीत, किंवा कुणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत.

वकिलांसाठी एक आचारसंहिता असते | Gunratna Sadavarte News

वकिलांसाठी एक आचारसंहिता असते, त्याचं उल्लंघन केल्याची तक्रार करण्यात आली आहे. वकिलीची वेशात सार्वजनिक ठिकाणी आंदोलन केल्याचं ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यावरुन सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

Gunratna Sadavarte News
गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यातील पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या आंदोलनाबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. दोन वर्षासाठी आता सदावर्ते कोणत्याही कोर्टात वकिली करु शकणार नाहीत, कुणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल या निर्णयाला ॲड. गुणरत्न सदावर्ते हे आव्हान देणार असल्याची माहिती आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर या आधीही अशी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळीही सदावर्ते यांनी त्या निर्णयाला आव्हान दिलं होतं.

दरम्यान, बार कौन्सिलच्या निर्देशाविरोधात गुणरत्न सदावर्ते कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. याआधीही बार कौन्सिलच्या निर्णयाविरोधात सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. सध्या गुणरत्न सदावर्ते राजधानी नवी दिल्लीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here