शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं नाव घेण्यावरुन ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुख्यमंत्र्यांसह नेत्यांना दिला हा इशारा

0

औरंगाबाद,दि.14: शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं एकेरी नाव घेण्यावरुन ॲड गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) यांनी इशारा दिला आहे. औरंगाबादचे नाव शिवसेनेचे नेते संभाजीनगर म्हणून घेतात. ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि ज्येष्ठ शिवसेना नेते दिवाकर रावते यांना इशारा दिला आहे. यापुढे छत्रपती संभाजी नगर म्हणालात तर ठीक अन्यथा तुम्हाला न्यायालयातच उभा करतो, असं जाहीर आव्हानच सदावर्ते यांनी दिलं आहे. शिवसेना नेते सातत्याने औरंगाबादचं नाव संभाजीनगर असं घेत असतात. एकतर एकेरी नाव घ्यायचं नाही. यापुढे एकेरी नाव घेतलं तर न्यायालयात उत्तर द्यायला तयार रहा, असा इशारा सदावर्ते यांनी दिला आहे.

औरंगाबाद येथे आज ॲड. गुणरत्न सदावर्ते आले होते. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला तसंच एसटी विलिनिकरण, म्हाडा पेपरफुटी अशा विविध विषयांवर आपली मतं मांडली.

शिवसेना नेत्यांनो, यापुढे छत्रपती संभाजी नगर म्हणाले तर ठीक अन्यथा तुम्हाला न्यायालयात उभा केलं जाईल. त्यामुळे महापुरुषांच्या नावाने शहर असलेल्या नावांचा उच्चार करताना एकेरी न करता आदरपूर्वक करावा. अशोक चव्हाण यापुढे एकरी नावाने शिवाजीनगर म्हणलेलं चालणार नाही, असंही सदावर्ते म्हणाले.

औरंगाबादमध्ये येण्यापूर्वी मला अनेक ठिकाणी पोलिसांकडून अडविण्यात आले. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही, माझं कोणत्या युनियनचं दुकान नाही, मी कष्टकऱ्यांचा आवाज आहे, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत एसटी विलीनीकरणाचा मुद्दा पुढे नेईन, असंही सदावर्ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here