Gulabrao Patil: मंत्री गुलाबराव पाटील यांचा राष्ट्रवादीबाबत मोठा गौप्यस्फोट

0

मुंबई,दि.5: मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी राष्ट्रवादीबाबत (NCP) मोठा गौप्यस्फोट केला आहे. आम्ही जर उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) भाजपसोबत (BJP) गेली असती असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला. राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो, तशी ती वेळ होती असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला. आमचं सरकार मजबूत आहे. राहिलेला दोन वर्षाचा कार्यकाळ शिंदे सरकार पूर्ण करेल, असा विश्वासही गुलबाराव पाटील यांनी व्यक्त केला.

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दावा केला आहे की, राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदार फुटले आहेत त्यांच्या पक्षप्रवेशाचा फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे. यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यापूर्वीच हा प्रयोग झाला असल्याचे पाटील म्हणाले. शिंदे सरकारनं जर हा उठाव केला नसता तर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेली असती, असेही गुलबाराव पाटील म्हणाले.

आम्ही मूळ शिवसेनेत

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, पक्ष सोडणे गैर नाही. परंतू, ज्या घरात वाढले ज्या घराने ओळख दिली त्यांच्यासोबत गद्दारी करणं चुकीचं आहे, असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला होता. यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही पक्ष कुठे सोडला आहे. आम्ही मूळ शिवसेनेत आहोत. बोर्डावर पक्षाचे नावही तेच आहे. आम्ही भाजपमध्ये गेलो का? आम्ही बाळासाहेबांची शिवसेना असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. आम्हाला ढाल तलवार चिन्हही मिळालं आहे. आम्ही पक्षांतर केलेलं नाही. जे पक्षांतर करतात त्यांच्यासाठी अजित पवारांचं वक्तव्य असेल असंही गुलाबराव पाटील म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here