मुंबई,दि.29: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी काल (दि.28) भाजपा नेत्यांची बैठक झाली. यानंतर या नेत्यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भाजपाने राज्य सरकार अल्पमतात असून त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशी मागणी राज्यपालांकडे केली होती.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचं आवाहन केल्यानंतरही शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. या संपूर्ण राजकीय पेचात आता राज्यपाल केंद्रस्थानी आले असून त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे. तसंच एकनाथ शिंदे गट आज मुंबईत परतणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. सरकारला 30 जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.