शासकीय कार्यालय, पेट्रोल पंपावर विना हेल्मेट नो एन्ट्री

0

नाशिक,दि.22: वाढणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट सक्ती (Helmet compulsory) करताना कठोर नियम करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये हेल्मेट सक्तीसाठी नवा नियम पुढील महिन्यापासून लागू होणार आहे. त्यानुसार शासकीय कार्यालयात आणि पेट्रोल पंपावरही विना हेल्मेट नो एन्ट्री असणार आहे.

स्वातंत्र्य दिनापासून विना हेल्मेट पेट्रोल बंदी झाल्यानंतर नाशिक शहरात आता 6 नोव्हेंबरपासून कुठल्याही शासकीय कार्यालयात विना हेल्मेट ‘नो एन्ट्री’ असणार आहे. शिवाय पेट्रोल पंप परिसरातच विना हेल्मेट वाहनधारकांना प्रवेश निर्बंध घालण्यात आले आहेत.

पेट्रोल पंप चालक आणि स्थानिक पोलिसांशी वाद घातल्यास संबंधितावर चॅप्टर केस करण्यात येणार आहे. शहरातील वाढते अपघात आणि त्यात होणारी मृत्यू बघता पोलीस आयुक्तांनी हे कठोर धोरण अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here