भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक?

0

इंदापूर,दि.9: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापुरमध्ये चप्पलफेक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून चप्पलफेक झाल्याचा दावा केला जात आहे. पडळकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना मोठा खुलासा केला आहे. नेमकं काय घडलं याबाबत पडळकर यांनी सविस्तर सांगितले आहे.

गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. इंदापुरात घडलेल्या प्रकाराची जोरदार चर्चा होत आहे. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून चप्पलफेक झाल्याची चर्चा आहे. इंदापूर प्रशासकीय भवनासमोर शिवधर्म फाऊंडेशनच्या दिपक काटे हे दुध दर वाढीच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. 

गोपीचंद पडळकर उपोषणकर्त्या शेतक-यांच्या भेटीसाठी आले होते. या ठिकाणी भेट द्यायला गेलेल्या गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेक झाल्याची माहिती समोर येत आहे. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी चप्पल फेक केल्याची माहिती समोर येतेय. कारण, पडळकर येथे शेतकऱ्यांना भेटून गेल्यानंतर मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

इंदापुरमध्ये चप्पलफेक झाल्याचे वृत्त गोपीचंद पडळकर यांनी फेटाळले आहे. असं काही घडलं नसल्याचे पडळकर म्हणाले. मी तेथून गेल्यानंतर घोषणाबाजी झाली की काय झाले ते मला माहित नाही असा खुलासा पडाळकर यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here