सोलापूर,दि.१९:Gopichand Padalkar Controversial Statement: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अतिशय खालच्या शब्दांत टीका केली होती. त्यांनी राजकारणातील स्तर किती खालच्या स्तराला गेला आहे हे दाखवून दिले. अलिकडच्या काळात राजकीय नेत्यात आणि कार्यकर्त्यात काही नैतिकता आहे की नाही अशी शंका उपस्थित होते. भाजपा आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या शब्दात टीका केली. जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली.
गोपीचंद पडळकर यांची अतिशय खालच्या शब्दांत टीका | Gopichand Padalkar Controversial Statement
गोपीचंद पडळकर म्हणाले, “अरे जयंत पाटला, तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात धमक आहे, कार्यक्रम करायची. आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून, तुझ्यासारखी मी औलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे?”
काय म्हणाले अजित पवार?
गोपीचंद पडळकर यांनी काय विधान केलं याची माहिती नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “वादग्रस्त विधानांसंदर्भात आमच्या महायुती सरकारचं एकमेव धोरण आहे. महायुतीमधील तीनही पक्षाती ज्या लोकांनी विधान केलं आहे, त्या पक्षाच्या नेत्यांनी त्याची दखल घ्यावी आणि भूमिका मांडावी, असे आमचे धोरण ठरले आहे, भाजपच्या संदर्भात ती जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे” असे पवार म्हणाले.








