Google-Apple च्या कारवाईमुळे रशियात लोकांना समस्येला जावे लागत आहे सामोरे, भारत या बाबतीत हुशार

0

दि.1: Google-Apple: युक्रेनवरील (Ukraine) हल्ल्यानंतर अमेरिका (US) आणि त्यांचे मित्र राष्ट्र सतत रशियावर निर्बंध लावत आहेत. रशियावर आर्थिक निर्बंध लादल्यानंतर आता अमेरिकन कंपन्याही रशियाविरोधात पावले उचलत आहेत. अशातच, टेक दिग्गज Google आणि Apple सारख्या कंपन्यांनी रशियामधील अनेक बँकांचे कार्डला सपोर्ट करणे बंद केले आहे. त्यामुळे रशियातील जनतेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. तथापि, या बाबतीत भारताची तयारी प्रशंसनीय आहे कारण देशाच्या डिजिटल पेमेंट प्रणालीवर स्वदेशी प्रणालीचे वर्चस्व आहे.

या रशियन बँकांच्या कार्डांवर परिणाम झाला

रशियन सेंट्रल बँकेच्या प्रसिद्धीनुसार, Apple आणि Google च्या कृतीमुळे प्रभावित झालेल्या रशियन बँकांमध्ये VTB Group, Sovcombank, Novikombank, Promsvyazbank आणि Otkritie FC बँक यांचा समावेश आहे. सेंट्रल बँकेने असेही म्हटले होते की या बँकांच्या कार्डद्वारे संपर्करहित पेमेंट केले जाईल, परंतु Google किंवा Apple सारख्या परदेशी सेवा प्रदात्यांकडून पेमेंट करता येणार नाही. त्याचप्रमाणे, या कार्डद्वारे परदेशी कंपन्या किंवा स्टोअरमध्ये ऑनलाइन पेमेंट केले जाणार नाही.

मॉस्को मेट्रो स्थानकांवर लांबच लांब रांगा

यानंतर, सोमवारी अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरवर सांगितले की Apple Pay आणि Google Pay ने रशियाची राजधानी मॉस्कोच्या मेट्रो नेटवर्कमध्ये काम करणे बंद केले आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागला. पेमेंट करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे मॉस्कोमधील मेट्रो स्टेशनवर लांबच लांब रांगा लागल्याची चर्चाही काही बातम्यांमध्ये झाली. या बातम्यांनंतर भारतीय वापरकर्त्यांनी BHIM UPI आणि Rupay पेमेंट सिस्टमवर चर्चा सुरू केली. अशाप्रकारे मंगळवारीही दिवसभर UPI आणि Rupay ट्विटरवर ट्रेंड करत राहिले.

भारतातील डिजिटल पेमेंटमध्ये स्वदेशी UPI चा दबदबा

UPI हा पूर्णपणे स्वदेशी डिजिटल पेमेंट इंटरफेस आहे. हे इतके सोपे आणि सुरक्षित आहे की यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने देखील त्याचे कौतुक केले आहे. गुगलने अमेरिकेत UPI लागू करण्याची किंवा तत्सम तंत्रज्ञान विकसित करण्याची मागणीही केली होती. आता UPI भारताबाहेरही वापरला जात आहे. शेजारी देश नेपाळने नुकतेच UPI स्वीकारले आहे. भारतातील Google Pay, Amazon Pay, Paytm, BHIM, BharatPe, PhonePe सारखी सर्व डिजिटल पेमेंट ॲप्स UPI इंटरफेसवर आधारित आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here