चित्रपटात अजित पवार,सुधीर मुनगंटीवार,जयंत पाटील आणि मला संधी द्या : गिरीश महाजन

0

जळगाव,दि.16: अजितदादा (Ajit Pawar), मुनगट्टीवार, जयंत पाटील, विखे पाटील आणि माझी आता आमदारकीच्या सहा टर्म झाल्या आहेत. पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला सिनेमात भूमिका दया अशी मागणी भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एका सिनेमा निर्मत्याकडे केली. जामनेर येथे हलगट या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी गिरीश महाजन म्हणाले यांनी सिनेमा निर्मात्यांकडे ही मागणी केली आहे.

गिरीश महाजन यांनी म्हटलं, बाबुराव घोंगडे यांना एक विनंती आहे, आमच्या सहा टर्म झाल्या आहेत. महाराष्ट्रात आम्ही दोन-चार, पाच आमदार सिनिअर आहोत. जयंत पाटील, अजितदादा, सुधिर मुनगंटीवार, विखे पाटील आणि माझ्या सहा टर्म झाल्या आहेत. मी सिनिअर वाटत नाही पण आहे. सहावी टर्म आहे माझी. पण पक्षाचं काही धोरण आहे की, एका व्यक्तीला किती वेळा तिकीट द्यायचं. त्यामुळे पुढे-मागे आमची रिटायरमेंट होणार. त्यामुळे तुमच्या सिनेमात आम्हाला एखादी जागा ठेवा. पुढे आम्ही करणार काय? भविष्यात तुमच्या सिनेमात आम्हाला एखादी भूमिका द्या.

यावर सिनेमा निर्माते बाबुराव घोंगडे गमतीने म्हणाले, तुमच्यासाठी इंग्रजी सिनेमा काढून त्यात काम करण्याची संधी देईन. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. जामनेर येथील बाबुराव घोंगडे यांनी हलगट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here