सोलापूर,दि.15: धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना 5 पट मोबदला द्यावा अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे. शनिवारी (दि. 14/10/2023) पुणे येथे रेल्वेच्या विभागीय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यानी धाराशिव मतदार संघातील रेल्वे संदर्भातील अनेक प्रश्नांवर चर्चा करत बैठकीत खालील महत्वाच्या खालील महत्वाच्या सूचना केल्या व त्यावर रेल्वे विभागाने तात्काळ कार्यवाही करणे बाबत सुचना केल्या.
2014 साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धाराशिव-तुळजापूर-सोलापूर या मार्गाची घोषणा केली होती त्यामुळे हा रेल्वे मार्ग 2024 पूर्वी पूर्ण करावा तसेच या रेल्वे मार्गाची भूसंपादन प्रक्रिया सुरू असून यामध्ये रेल्वे व जिल्हा प्रशासन रेल्वे ॲक्टप्रमाणे सक्तीने भूसंपादन प्रक्रिया राबवत आहेत. मात्र शेतकरी बांधवांना यामुळे जमिनीचा मोबदला 4 पट मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी यास असहमती दाखवली आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने थेट खरेदीने व शेतकऱ्यांच्या सहमतीनेच प्रक्रिया राबवावी जेणे करून शेतकरी बांधवांना जमिनीचा मोबदला हा 5 पट मिळणार आहे.
कळंब रोड स्टेशन व ढोकी स्टेशन येथे रेल्वे गाड्याना थांबा द्यावा.गोवर्धवाडी व रुई येथे उड्डाण पूल करावा. नवीन हरंगुल पुणे इंटरसिटी च्या वेळेत बदला करावा व ही रेल्वे नियमित करणे बाबत सुचना केली तसेच लातूर मुंबई नवीन वंदे भारत ट्रेन चालू करावी मतदारसंघात येणाऱ्या सर्व स्टेशन वर कोच इंडिकेटर बसवावे. बार्शी स्टेशन चा समावेश अटल अमृत मध्ये करावा. नॅरो गेज ब्रॉड गेज व विद्युतीकरण करताना भूसंपादन झालेल्या शेतकरी बांधवांना मोबदला द्यावा.रेल्वे मार्गाच्या शेजारच्या साईड रोडची कामे दर्जेदार करावीत.पत्रकार वरीष्ठ नागरीक व दिव्यांग बंधूंना पूर्वी प्रमाणे दिली जाणारी रेल्वे प्रवासात सवलत चालू करावी.पनवेल ट्रेन साठी आवश्यक कोटा बार्शी स्टेशन हुन मंजूर करावा. अशी मागणी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली.
या बैठकीस खासदार व रेल्वे समितीचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, खासदार धैर्यशील माने, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार जयसिद्धेवर स्वामी महाराज ,खासदार, सदाशिव लोखंडे, खासदार सुधाकर शृंगारे, रेल्वेच्या पश्चिम विभागाचे जनरल मॅनेजर नरेश लालवानी, पुणे व सोलापूर विभागाचे प्रबंधक बैठकीस उपस्थित हाते डिव्हिजनल उपरोक्त मागणी सह थेट खरेदी द्वारे धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे प्रकल्पा करीत संपादित केलेल्या जमीनीचा मावेजा देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करणे बाबत सुचना करण्यात आल्या.