Girish Mahajan: हनी ट्रॅप प्रकरण भाजपा नेते गिरीश महाजन यांनी फोटो शेअर करत विचारले…

0

मुंबई,दि.२५: Girish Mahajan On Praful Lodha: भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी फोटो शेअर करत विरोधकांना चांगलेच धारेवर धरले आहे. भाजपाचे प्रफुल लोढा यांच्यावर हनी ट्रॅप प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोढा आणि महाजन यांचा फोटो व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता महाजन यांनीही फोटो शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत. 

गिरीश महाजन यांनी फोटो केला शेअर | Girish Mahajan On Praful Lodha

प्रफुल लोढा यांचे शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो दाखवत भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे. प्रफुल लोढा आणि गिरीश महाजन यांचे फोटो विरोधकांकडून दाखवल जात आहे. त्याला महाजन यांनी दाखवत उत्तर दिले आहे. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षातील काही नेत्यांनी गिरीश महाजनांना या प्रकरणात ओढले आहे. गिरीश महाजन यांचे हनी ट्र्रॅप प्रकरणात अडकलेल्या प्रफुल पटेल यांच्यासोबत जवळचे संबंध असल्याचा आरोप होत आहे.

गिरीश महाजन यांनी विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले. महाजन म्हणाले, “हनी ट्रॅप प्रकरणानंतर काहीही संबंध नसताना केवळ एका फोटोच्या जोरावर प्रफुल्ल लोढासोबत माझे नाव जोडण्यात काही रिकामटेकडे लोक पुढे आहेत. त्यांच्याच पक्षाचे नेते असलेल्या शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांच्यासोबत प्रफुल्ल लोढाचे असंख्य फोटो आहेत. आता या लोकांचे प्रफुल्ल लोढा सोबत काय संबंध आहेत?”, असा उलट सवाल महाजनांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here