Gautam Adani: गौतम अदानी आता बनले जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती

0

सोलापूर,दि.27: गौतम अदानी (Gautam Adani) आता केवळ भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले नाहीत, तर ते आता जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची संपत्ती मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सच्या (Bill Gates) बरोबरीची आहे. Gautam Adani has now become the fourth richest person in the world

वॉरेन बफेट यांनी लॅरी पेजला मागे टाकले

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, अदानी आणि गेट्स या दोघांची एकूण संपत्ती $125 अब्ज आहे. आता त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी, वॉरेन बफेट, गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन यांना मागे टाकले आहे.

फोर्ब्सनुसार पाचव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती

रिअल टाईम बिलियनेअर इंडेक्सनुसार, गौतम अदानी हे जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. या यादीत ते बिल गेट्सच्या मागे आहेत. येथे त्यांची एकूण संपत्ती $129 अब्ज एवढी आहे. तर बिल गेट्सची एकूण संपत्ती 129.4 अब्ज डॉलर एवढी आहे.

गौतम अदानी यांच्या संपत्तीत एका दिवसात वाढ

अवघ्या एका दिवसात 6.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. एकट्या 2022 मध्ये अदानी यांच्या संपत्तीत 48.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. 2021 च्या शेवटी, गौतम अदानी यांची संपत्ती $ 76.7 अब्ज होती. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. यापूर्वी त्यांच्या अदानी पॉवर आणि अदानी विल्मार या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये सतत अपर सर्किट जाणवत आहे.

लवकरच तिसरी श्रीमंत व्यक्ति होऊ शकतात

इलॉन मस्क, जेफ बेझोस, बर्नार्ड अर्नॉल्ट आणि बिल गेट्स हे तिसर्‍या श्रीमंत अब्जाधीशांच्या
यादीत अदानीच्या पुढे आहेत . परंतु या सर्वांच्या मालमत्तेत सातत्याने घट होत आहे, म्हणजेच ते रेड झोनमध्ये आहेत. अदानी सतत वाढत असून ग्रीन झोनमध्ये आहे. गौतम अदानी यांनी ही गती कायम ठेवली तर ते लवकरच जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती बनतील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here