स्वामी भक्तीचा सहवास लाभणे म्हणजे जीवनातील पूर्वपुण्याईच्या कर्माचे फळ: डॉ. श्रीकांत कुलकर्णी

0

अक्कलकोट,दि.२३: आपण श्री स्वामी समर्थांचे (Shri Swami Samarth) निस्सीम भक्त आहोत. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतानाही आपण स्वामी भक्तीचा आनंद नियमितपणे अनुभवतो, त्यामुळे स्वामी भक्तीचा सहवास लाभणे म्हणजे जीवनातील पूर्वपुण्याईच्या कर्माचे फळ असल्याचे मनोगत निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी (Dr. Shrikant Kulkarni) यांनी व्यक्त केले.

त्यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात (Shri Vatvriksha Swami Maharaj Temple) येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे (Mahesh Ingle) यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना डॉ.कुलकर्णी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी दंत चिकित्सक डॉ. रोहन वायचळ, अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे, विस्तार अधिकारी महेश भोरे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, सागर गोंडाळ, गिरीश पवार, रवी मलवे, प्रसाद सोनार, चंद्रकांत कवटगी, संजय पवार इत्यादी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here