सोलापूर,दि.२: आस्था रोटी बँक, लायन्स क्लब ऑफ सोलापूर, व सूर्यमुखी मारुती चारिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिर संगम नगर जुना विडी घरकुल जवळ येथे आयोजित करण्यात आले होते
आस्था रोटी बँक नेहमी सामाजिक कार्याचा हेतू समोर ठेवून कार्य करताना दिसून येत आहे. त्यामध्ये अन्नदान, वस्त्रदान निराधारांना आधार बेगर आहेत त्यांना घरासाठी मदत व ज्यांचे नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाले त्यांना मदत. हिंदू धर्मातील महत्त्वाचे सण समारंभाच्या वेळी रस्त्यावरील भटके, अनाथ लहान पोरं वयस्कर अशा व्यक्तींना त्यांच्या गरजा पाहून मदत करणे आजारी व्यक्तींना मोफत सिविल हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यापासून ते एखाद्या व्यक्ती रस्त्यावर जर मृत्यू झाला तर त्यांच्या अंतिम संस्कार तयारी करण्यापर्यंत आस्था रोटी बँकेचे कार्य करण्यात अग्रेसर असलेली दिसून येते.
आस्था रोटी बँकेचा हेतू शुद्ध असल्यामुळे अनेक दानशूर व्यक्ती पुढे येऊन मदत करताना दिसतात. व आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष विजय छंचुरे व त्यांचे सहकारी यांच्या कौतुक होताना दिसत आहे. हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे असे म्हणावे लागेल. आस्था रोटी बँकेतर्फे ( २-१०-२०२२) संगम नगर झोपडपट्टी भागात जे वयस्कर व हाटीदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यामध्ये जवळ जवळ १०३ लोकाची तपासणी करून त्यामधील या ३५ लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे.
त्यामुळे या ३५ लोकांचा दृष्टी दोष दूर होऊन त्या लोकांना नवीन दृष्टी अनुभवास मिळणार आहे. त्याचबरोबर वयस्कर लोकांना बीपी, शुगर, गुडघे तपासणी केले जाणार आहे त्यांच्यावर औषध, गोळ्या आस्था रोटी बँकेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या शिबिराच्या प्रसंगी रुपेश जाधव, डॉ. शिवाजी पाटील, विजय छंचुरे, मल्लिकार्जुन आरकल, राजु हौशेट्टी, नीलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, योगेश कुंदुर, निनाद आकतनाळ, अनिल जाधव, छाया गंगणे, या सर्वांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिता तालीकोटी, साई माचरला, नरेश चिट्ट्याल, राहुल माचरला, शरण, कल्पना कोळी, या सर्वांचे मदत केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा हिरेमठ यांनी केले. छाया गंगणे यांनी प्रमुख पाहुण्याचे आभार मानले.