दैवी अवतार असल्याचे सांगत भोंदू बाबांकडून लाखो रुपयांची फसवणूक

0

नांदेड,दि.14: देवी अवतार असल्याचे सांगत भोंदू बाबाने अनेकांना लाखों रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. भगवान दत्ताचा अवतार असल्याचे सांगत अनेकांना गंडा घालणाऱ्या भोंदू बाबाला माहूर पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. विश्वजीत कपिले असे या भोंदू बाबांचे नाव असून त्याने मुंबईसह पुण्यातील अनेकांना गंडा घातला आहे. हा भोंदू बाबा स्वतःची देवाप्रमाणे पूजा अर्चना आपल्या भोळ्या भक्तांकडून करवून घेत असे, याचे व्हीडिओ शूटिंग भक्तांनीच पोलिसांना उपलब्ध करून दिले.

असाध्य आजार बरे करुन देण्याचा दावा हा भोंदूबाबा करत असे, तसेच नोकरी लावून देणे, कौटुंबिक कलह दूर करून देण्याचा दावाही हा बाबा करत होता. त्यासाठी अघोरी पूजा करायला तो भक्तांना सांगत असे, त्यासाठी भाविकांकडून लाखो रुपये देखील महाराजाने उकळले आहेत.

चोवीस लाख उकळले

मांडूळ, कासवाची पूजा करण्याच्या नावाखाली तो फसवणूक करत होता. या प्रकरणी डोंबिवली इथल्या प्रवीण शेरकर यांच्या तक्रारी वरून माहूर पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. एकट्या शेरकर यांच्याकडून या भोंदू बाबाने चोवीस लाख रुपये उकळल्याची तक्रार आहे.

या भोंदू बाबाने चक्क दत्त शिखर देवस्थानावर आपला बाजार मांडला होता, मात्र त्याची भोंदूगिरी लक्षात येताच देवस्थानने त्याला हाकलून दिले होते. आता रात्री या बाबाला अटक करण्यात आले असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या खळबळजनक प्रकाराने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here