कार अन् एसटी बसचा भीषण अपघात: नांदणीचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे जागीच ठार

0

सोलापूर,दि.28 : एसटी आणि फॉर्च्युनर गाडीची समोरासमोर धडक (ST and Fortuner collided head-on) होऊन झालेल्या भीषण अपघातात (terrible accident) दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी गावचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे (Former Sarpanch of Nandani village Chidananda Suravase) यांच्यासह तीनजण जागीच ठार झाले. ही घटना कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील बसवकल्याणच्या जवळपास घडल्याची माहिती समोर येत आहे.

मृत चिदानंद सुरवसे (वय 47) यांची फॉर्च्युनर गाडी एम एच 13 सी एस 3330 ही कर्नाटक राज्यातील एसटी क्रमांक के ए 22 एफ 2198 ला धडक झाल्यानंतर पलटी होऊन चक्काचूर झाल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. या अपघातानंतर चौघेही जागीच ठार झाले आहेत. सुरवसे यांच्यासोबत आणखी तिघे कोण होते त्यांची नावे अद्याप ही समोर आलेली नाहीत. दरम्यान या चारी मृतदेहांना विजयपूर मधील शासकीय हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच चिदानंद सुरवसे यांचे कुटुंबीय ताबडतोब विजयपूरकडे रवाना झाले आहेत. चिदानंद सुरवसे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक होते. नांदणीचे ते अनेक वर्षे सरपंच राहिले आहेत या अपघातानंतर दक्षिण सोलापूर तालुक्‍यात हळहळ व्यक्त केली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here