भाजपा माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा गोळीबारात मृत्यू

0

जळगाव,दि.10: भाजपा माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. महेंद्र मोरे यांच्यावर चाळीसगाव येथे गोळीबार करण्यात आला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. महाराष्ट्र गोळीबाराच्या घटनांनी हादरला आहे. शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नावाच्या व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली.

तीन दिवसांपूर्वी काही अज्ञातांनी चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर गोळीबार केल्याची घटना घडली होती. गोळीबारात मोरे गंभीर जखमी झाले होते. महेंद्र मोरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. उपचारादरम्यान महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले होते. दरम्यान ही हत्या करणाऱ्या आरोपींचा पोलीस अद्याप शोध घेत आहेत.

माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. महेंद्र मोरे यांच्यावर सुरुवातीला चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचराचांना साथ देत नसल्याने त्यांना नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरु असताना महेंद्र मोरे यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, मोरेंवर गोळीबार करणाऱ्या सात जणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here