राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात एफआयआर दाखल : क्रांती रेडकर

0

दि.२७: राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती क्रांती रेडकर यांनी दिली. क्रूझ ड्रग पार्टीवर मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कारवाई केल्यापासून राष्ट्रवादीचे नेते मंत्री नबाब मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. आर्यन खान प्रकरणात वादात सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे हे मुस्लीम आहेत की नाही यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. याचसंदर्भात समीर यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी आज एक अगदीच वेगळा दावा केला असू हा दावा सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय आहे. समीर यांच्या वडिलांबरोबरच त्यांच्या पत्नीने म्हणजे क्रांती रेडकर यांनी दाऊद नाव निकाह नाम्यावर कुठून आलं याबद्दलचं उत्तर एएनआयशी बोलताना दिलं आहे.

दरम्यान, समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्याचे सांगितले आहे.”निकाहनामा बरोबर आहे. निकाह झाला पण समीरने कायदेशीररित्या धर्म, जात बदलली नाही. माझी सासू मुस्लिम असल्याने आणि त्यांच्या आनंदासाठी निकाह झाला ही केवळ औपचारिकता होती. नवाब मलिक यांनी शेअर केलेले जन्म प्रमाणपत्र चुकीचे आहे.” असे क्रांती रेडकर म्हणाल्या. 

“आमचे वैयक्तिक फोटो शेअर करून नवाब मलिक त्यांनी घेतलेल्या संवैधानिक शपथेविरुद्ध काम करत आहे. आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, एफआयआर नोंदवण्यात आला आहे. समीर वानखेडे यांना पदावरून हटवण्याचा त्यांचा एकच हेतू आहे जेणेकरून त्यांच्या जावयाला वाचवता येईल.”, असा आरोप देखील क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्यावर केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here