Kirtikumar Bhangdiya: भाजपा आमदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Kirtikumar Bhangdiya: किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय

0

चंद्रपूरः FIR Against Kirtikumar Bhangdiya: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अत्यंत निकटवर्तीय चिमूरचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया (Kirtikumar Bhangdiya) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील काँग्रेस जिल्हा सरचिटणीसाचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण? | Kirtikumar Bhangdiya

या प्रकरणात मारहाण झालेल्या महिलेने आमदार भांगडीया यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पिडीत महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पिडीत महिला या पती साईनाथ बुटकेसह चिमूर या ठिकाणी राहतात.

साईनाथ यांचा मोठा भाऊ गजानन बुटके हे काँग्रेस पक्ष चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत. 11 तारखेच्या दिवशी सायंकळी सात-साडेसातच्या सुमारास भाजपचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन बुटके यांच्या घराबाहेर आले. बुटके यांना शिवीगाळ केली. बुटतकेंच्या घराच्या आत जबरदस्तीने शिरले. साईनाथ यांना मारहाण केली. मारहाण करतच त्यांना घराबाहेर ओढून आणले. या मारहाणीला विरोध करताना, त्यांचा विनयभंग केला गेला, असा आरोपपिडीत महिलेने केला आहे.

आमदार भांगडीया यांच्यावर गुन्हा दाखल | FIR Against Kirtikumar Bhangdiya

11 तारखेला सायंकाळी साडे सातच्या सुमारास भाजपचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह बुटके यांच्या घराच्या बाहेर आले. त्यांनी बुटके यांना शिवीगाळ करून त्यांच्या घरात जबरदस्तीने शिरले आणि साईनाथ यांना मारहाण करत बाहेर घेऊन आले. या मारहाणीला विरोध केला असता, त्यांचा विनयभंग केला आणि मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

यासोबतच, आमदार भांगडिया यांच्या कार्यकर्त्यांनी पीडित महिला, साईनाथ आणि त्यांच्या दोन्ही लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आली, असे पिडीताने म्हंटले आहे. काँग्रेसचे पदाधिकारी असलेले गजानन बुटके ही यावेळी घटनास्थळी दाखल झाले असता, गजानन यांना ही रोखण्याचा भांगडीयांना प्रयत्न केला. त्यांना देखील भांगडीया यांनी मारहाण केली, असंही दाखल केलेत्या तक्रारीत म्हंटले गेले आहे.

पिडितेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर भाजप आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यासह, त्यांच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांविरूद्ध कलम 354 अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here