जाणून घ्या कतरिना कैफची एकूण संपत्ती किती आहे, ती एका चित्रपटासाठी घेते एवढे मानधन

0

दि.15: सध्या अभिनेत्री कतरिना कैफचे (Katrina Kaif) तारे जोरात आहेत. रील लाईफपासून ते रिअलपर्यंत सर्वत्र कतरिना सुपरहिट ठरत आहे. नुकताच कतरिनाचा ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाने धमाकेदार सुरुवात केली. हा चित्रपट लवकरच 150 कोटींचा कलेक्शन पार करणार आहे. वर्ष संपण्यापूर्वीच कतरिनाचा चित्रपट सुपरहिट झाला, यापेक्षा तिच्यासाठी चांगले काय असू शकते.

कतरिना ही बॉलिवूडमधील मेहनती आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. काही वर्षांतच तिने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच आज मोठमोठे स्टार्सही तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत.

कतरिनाने 2003 मध्ये ‘बूम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आज तिने 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कतरिनाचा बॉलिवूडमधील प्रवास अजिबात सोपा नव्हता. लंडनहून भारतात आलेल्या कतरिनाने चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर आणि भाषेवर खूप मेहनत घेतली.

कतरिनाच्या मेहनतीचे फळ आहे की आज तिची एकूण संपत्ती 224 कोटी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, कतरिना एका चित्रपटासाठी जवळपास 11 कोटी रुपये मानधन घेते. त्याच वेळी, जाहिराती करिता फी 6-7 कोटी रुपये आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे 224 कोटींच्या मालमत्तेची मालक असूनही कतरिनाने इतक्या वर्षांत मुंबईत घर घेतलेले नाही. भरपूर कमाई करूनही कतरिना आजही भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहते.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात कतरिनाने बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमार याच्यासोबत बहुतेक चित्रपट केले आहेत. या चित्रपटातील दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनीही दाद दिली आहे.

सध्या कतरिनाही तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार, लवकरच विकी कौशल कतरिना कैफसोबत आयुष्याचा नवा प्रवास सुरू करू शकतो. या जोडप्याच्या लग्नाचे ठिकाण जयपूर आहे.

विकी कौशलच्या आधी कतरिनाचे रणबीर कपूर आणि सलमानसोबतही अफेअर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली होती, पण कपूर कुटुंबाला रणबीर आणि कतरिनाची जोडी आवडली नाही. त्यामुळे दोघांनी वेगळे होणे योग्य मानले.

‘सूर्यवंशी’नंतर फॅन्स कतरिनाच्या ‘फोन भूत’ या पुढच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. ज्यामध्ये तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here