Brij Bhushan Singh: खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

0

मुंबई,दि.२९: भाजपा खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. बृजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. तसेच राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी केली होती. राज ठाकरेंविरोधात बृजभूषण सिंह यांनी ठिकठिकाणी मेळावे, रॅली काढून मनसेला चिथावणी देणारी विधानं केली होती. राज ठाकरे यांच्या विरोधात बोलणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात मनसे पदाधिकारी आणि मनसे जनहित सेलच्या वकिलांनी दादर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अयोग्य भाषा वापरल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ब्रजभूषण यांच्या विरोधात तक्रार दाखल करणारे मनसे उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील म्हणाले की, त्यांनी राज ठाकरेंबद्दल अयोग्य भाषा वापरली होती. ब्रजभूषण यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात राहणाऱ्या दोन समाजात तेढ पसरवून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दादरमध्ये मनसेच्या वकिलांची आणि अधिकाऱ्यांची टीम जमली होती. वकील गजणे, वकील रवी पष्टे, विभागप्रमुख शंकर नागवेकर यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here