fighter jet mirage: ट्रकचे टायर समजून नेले विमानाचे टायर
लखनऊ,दि.5: 27 नोव्हेंबर रोजी लखनौमध्ये चालत्या ट्रकमधून भारतीय हवाई दलाच्या (IAF) मिराज लढाऊ विमानाचा (fighter jet mirage) कथितरित्या चोरीला गेलेला टायर सापडला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी ही माहिती दिली आहे. टायर लखनऊच्या बक्षी का तालब एअरफोर्स स्टेशनवरून राजस्थानमधील जोधपूर एअरबेसमध्ये नेले जात होते.
लखनौ पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, दोन पुरुष 4 डिसेंबर रोजी बक्षी का तालाब एअर फोर्स स्टेशनवर टायर घेऊन आले आणि त्यांनी दावा केला की त्यांना ते रस्त्यावर सापडले जेथे कथित चोरीची नोंद झाली होती. त्याचवेळी ते ट्रकचा टायर समजून घरी नेल्याचे त्यांनी सांगितले.
लखनौच्या शहीद पथ परिसरात मिराज-2000 फायटर जेट आणि हवाई दलाच्या इतर उपकरणांच्या नवीन टायर्सची खेप बक्षी का तालाब एअरफोर्स स्टेशनवरून जोधपूर एअरबेसकडे नेली जात असताना ही कथित चोरी झाली.
चोरीनंतर ट्रक चालकाने लखनौ पोलिसात एफआयआर दाखल केला होता. शहरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना थोडावेळ थांबल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर चोरी झाली.