मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर जीवघेणा हल्ला

0

बीड,दि.16: मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल खुणे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. जरांगे यांचे समर्थक असलेले अमोल खुणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी दगडाचा वर्षावर करत हल्ला केला. या हल्लामध्ये अमोल खुणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने उपचारांसाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी (दि.15) गेवराईहून आपल्या धानोरा गावी जात असताना रस्त्यात दबा धरून बसलेल्या चार जणांनी अमोल खुणे यांच्यावर अचानक दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये अमोल खुणे यांच्या डोक्याला जबर मार लागला.

या हल्ल्यात जबर जखमी झालेले अमोल खुणे रस्त्यावर उभे असताना त्यांना काही स्थानिक लोकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अमोल खुणे हे धानोरा गावचे रहिवासी आहेत. ते सुरूवातीपासून मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. कोपर्डी अत्याचारातील आरोपीवर हल्ला केल्याप्रकरणी अमोल खुणे हे दोन वर्ष जेलमध्ये होते. जेलमधून बाहेर आल्यावर अमोल खुणे हे जरांगे पाटील यांच्यासोबत काम करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here