काश्मीरी पंडितांबाबत फारूक अब्दुल्ला यांचे मोठं वक्तव्य

0

दि.16: जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी काश्मीरी पंडितांबाबत मोठं विधानं केलं आहे. फारूक अब्दुल्ला यांनी काश्मिरी पंडितांवरील हल्ल्यांचा संबंध ‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाशी जोडला आहे. ”काश्मिरी पंडितांवर होणारे हल्ले थांबवायचे असतील, तर सरकारने द काश्मीर फाइल्स या चित्रपटावर बंदी घालावी,” असे वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केले आहे. 

मीडियाशी संवाद साधताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, ”सध्या देशात मुस्लिमांविरोधात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळेच काश्मीरमधील मुस्लिम तरुणांमध्ये संताप पसरतो आहे. मी सरकारला विचारले की, काश्मीर फाइल्स चित्रपट खरा आहे का? मुसलमान आधी हिंदूला मारेल, मग त्याचे रक्त तांदळात टाकून त्याच्याच बायकोला खायला सांगेल. हे होऊ शकतं का? आम्ही इतके खालच्या पातळीला गेलो आहोत का?’

लष्कर-ए-इस्लामने धमकी दिली

गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवरील हल्ले अचानक वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर नायब राज्यपालांच्या आदेशानुसार खोऱ्यातील काश्मिरी पंडितांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी लष्कर-ए-इस्लामनेही धमकी दिली होती. “तुमचा बचाव दुप्पट-तिप्पट करा. काश्मिरी पंडितांनी खोरे सोडावे नाहीतर टार्गेट किलिंगसाठी तयार व्हावे,” असे म्हटले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here