Farmer Viral Video: शेतकऱ्याचा नादच खुळा! ऑडीकारने बाजारात येतो अन् भाजी विकतो

0
शेतकऱ्याचा नादच खुळा

सोलापूर,दि.29: Farmer Viral Video: सध्या केरळमधील (kerala) एका शेतकऱ्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, पण सध्या याच जगाच्या पोशिंद्यावर दयनीय अवस्था आली आहे. कधी पाऊस पडत नाही, कधी  पिकाला भाव मिळत आहे, तर कधी खतांच्या किमती वाढतात. अशा कठीण परिस्थितीमध्येही शेतकरी जगतो आणि पुढे जातो.

Farmer Viral Video: शेतकऱ्याचा नादच खुळा

तुम्ही अनेकदा शेतकऱ्यांना हातगाडा, ट्रॅक्टर किंवा ऑटोरिक्षात भाजी विकताना पाहिले असेल. पण, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण शेतकरी चक्क ऑडी कारमध्ये भाजी विकताना दिसतोय. 

सध्या केरळमधील (kerala) एका शेतकऱ्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण हा शेतकरी आपल्या ऑ़डी A4 या गाडीतून भाजी विकत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं त्यानं आपल्या शेतीत अमूलाग्र बदल केले आहेत. विविध पिकांच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेतलं आहे. सुजीत असं या शेतकऱ्याचं नाव असून, सध्या सोशल मीडियावर या शेतकऱ्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

अनेकजण म्हणतात, शेती सोपी नाही. हे जोखमीचे काम आहे. हवामानापासून इतर अनेक संकट शेतकऱ्यावर ओढावतात. पण तंत्रज्ञानाच्या साथीने आज देशात अनेक शेतकरी मोठी क्रांती घडवून आणत आहेत. प्रगत शेतीच्या जोरावर अनेक शेतकरी आज श्रीमंतही झाले आहेत. विशेष म्हणजे, सुशिक्षित तरुणही मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळत आहेत. केरळमधील या तरुण शेतकऱ्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, केरळमधील या शेतकऱ्याचे नाव सुजीत आहे. केरळमधील हा शेतकरी चक्क त्याच्या ऑडी A4 मध्ये बसून बाजारात येतो आणि शेतातल्या हिरव्यागार भाज्या विकतो. या तरुणाने आधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत शेती पद्धतीचा अवलंब केला आणि आज तो त्यांच्या शेतातून लाखोंची कमाई करत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here