Faraz Malik: नवाब मलिकांच्या मुलाच्या अडचणी वाढणार, फराज मलिकविरोधात गुन्हा दाखल

Faraz Malik: व्हिसासाठी बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0

मुंबई,दि.19: राष्ट्रवादीचे नेते आमदार नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुलाच्या अडचणी वाढणार आहेत. मुलगा फराज मलिकच्या (Faraz Malik) अडचणी वाढणार आहेत. फ्रान्सचे नागरिकत्व असलेल्या महिलेच्या व्हिसासाठी बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी फराज मलिक आणि त्यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा केलेल्या लॉरा हॅमलीनसह इतर जणांविरोधात कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा Solapur: उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्या चौकशीचे आदेश; जयराज नागणसुरे यांनी केली तक्रार

बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र | Faraz Malik

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2019 मध्ये हॅमलीनचा टुरिस्ट व्हिसाची मुदत संपल्याने तिने व्हिसासाठी विशेष शाखा 2 मध्ये अर्ज केला. यावेळी फराज मलिक सोबतचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच फराज मलिक यांचे हमीपत्रासह कागदपत्रे जमा केली. मात्र, कागदपत्रांबाबत विशेष शाखेला संशय आल्याने त्यांच्याकडून याबाबत तपास सुरू होता. अखेर, गेल्या आठवड्यात हे प्रकरण कुर्ला पोलिसांकडे तपासासाठी आले. कुर्ला पोलिसांनी केलेल्या चौकशीत, व्हिसासाठी दिलेल्या विवाह प्रमाणपत्राची नोंदणी केली नसतानाही बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, पोलिसांनी हॅमलीन, फराज विरोधात बनावट कागदपत्रे तयार केल्याचा ठपका ठेवत फसवणूक, बनावट कागदपत्रे, फॉरेन ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Faraz Malik
फराज मलिक

फराज मलिक याचे बुशराहसोबत पहिले लग्न झाले असून तिला दोन मुली आहे. ती फराज सोबत राहत नसून दुसरीकडे राहण्यास आहे.

कोविड, गर्भवती राहिल्याने व्हिसामध्ये केली होती वाढ

24 एप्रिल 2015 मध्ये फराजने लॉरासोबत दुसरा विवाह केला. त्यानंतर, अनेकदा कोविड तसेच गर्भवती राहिल्याने टुरिस्ट व्हिसामध्ये वाढ करण्यात आली होती. मात्र, पुढे तिने भारतीय व्यक्तीसोबत विवाह केला म्हणून “एक्स वन” व्हिसासाठी अर्ज केला. 

याअंतर्गत परदेशी व्यक्तीला भारतीय व्यक्तीशी लग्न केल्याबाबत नमूद होते. आणि ती भारतात राहू शकते. मात्र, त्यांच्या विवाह प्रमाणपत्राबाबत संशय येताच विशेष शाखेने याबाबत पालिकेच्या एल विभागाकडे चौकशी केली.

तेव्हा, फराजने ऑनलाईन अर्ज केले असून नोंदणीसाठी आला नसल्याचे सांगितले. त्यानुसार, हे प्रकरण समोर आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here