ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची ७५ केंद्रांवर पडताळणीत ही माहिती आली समोर

0

नांदेड,दि.९: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकाल २३ नोव्हेंबरला लागला. मतमोजणीनंतर अनेकांनी ईव्हीएम मशीनवर संशय घेतला होता. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रत्येक‎विधानसभा क्षेत्रातील पाच केंद्रांच्या ‎‎ईव्हीएमवरील मतांची आकडेवारी, ‎‎व्हीव्हीपॅटशी जुळते का याची तपासणी‎केली जाते. नांदेड जिल्ह्यातील लोकसभेच्या ३० आणि ‎‎विधानसभेच्या ४५ अशा एकूण ७५‎मतदान केंद्रांची तपासणी शनिवारी‎ करण्यात आली.

या तपासणीत मतमोजणी बिनचूक निघाली असून त्यात एकाही मताचा फरक नसल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. ईव्हीएम मशीनवरील मते आणि व्हीव्हीपॅटशी मते जुळत असल्याची खात्री करण्यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येते. मतमोजणी दरम्यान प्रत्येक‎विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय पाच‎ व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या प्रत्यक्ष मोजण्यात‎आल्या. त्यांची ईव्हीएममधील मतांसोबत‎पडताळणी करण्यात आली.

विधानसभा‎निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यातील ९‎विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी ५‎याप्रमाणे ४५ मतदान केंद्रांच्या‎व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या आणि‎ईव्हीएममधील मतांची आकडेवारी‎पूर्णपणे जुळली. तसेच लोकसभा‎पोटनिवडणुकीसाठी लोकसभेतील ६‎विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी ५ प्रमाणे,‎३० मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या‎चिठ्ठ्यांची पडताळणी करण्यात आली.‎सर्व ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे‎आकडे जळून आले.‎


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here