Sanjay Raut: तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील: संजय राऊत

0

मुंबई,दि.12: शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभेच्या निवडणूक निकालावरून भाजपावर टीका केली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. मात्र अटीतटीच्या लढतीत भाजपाने विजय मिळवला. या निवडणुकीत दगाबाजी करणाऱ्यांची नावे संजय राऊत यांनी जाहीर केली होती. अपक्ष आमदारांनी दगाबाजी केली असल्याचे त्यांनी सांगितले होते. आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) शिवसेनेला मतदान करतील, आम्हाला काय म्हणायचं आहे हे अपक्षांना माहिती आहे. कोणत्याही अपक्षाचा अवमान करण्याचा प्रश्न नाही, पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव आहे. आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता आहे. आणि आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युती टिकवण्याचं श्रेय नक्कीच गोपीनाथ मुंडे यांना जातं. पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव आहे. आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता आहे. आणि आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे असं राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आल्याचे तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) म्हटले असून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. फुटीरतावादी शक्तींविरुद्ध मजबूत आणि प्रभावी विरोध करण्यासाठी त्यांनी 15 जून रोजी कॉन्स्टिट्यूशन क्लब दिल्ली येथे होणाऱ्या संयुक्त बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विरोधी मुख्यमंत्री आणि नेत्यांना पत्र लिहिले आहे. या बैठकीला शिवसेनेकडून प्रतिनिधी बैठकीला हजर राहणार असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here