दंगली नंतरही मुस्लीम बांधवांनी मंदिराचे तर हिंदू बांधवांनी मशिदी व दर्ग्याचे रक्षण करून जपला जातीय सलोखा

0

अमरावती,दि.20: त्रिपुरा कथित हिंसाचार प्रकरणानंतर अमरावतीत पडसाद उमटले होते. रझा अकादमीकडून 12 नोव्हेंबर शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेला निघाला होता. या मोर्चात जवळपास 15 ते 20 हजार आंदोलक सहभागी झाले होते. मात्र, या मोर्चाला नंतर हिंसक वळण लागले होते. यावेळी आठ ते दहा दुकानांची तोडफोड झाली होती. तसेच काही दुकानदारांना मारहाण करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली.

रझा अकादमीच्या मोर्चा विरोधात भाजपने दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला अमरावती बंदची हाक दिली. पण याही बंदलानंतर हिंसक वळण लागलं. या हिंसाचाराच्या घटनांनंतर पोलिसांनी अमरावतीत जमावबंदी लागू केली. संपूर्ण शहरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

पण अशाही परिस्थिती काही मुस्लीम बांधवांनी हिंदूंच्या मंदिराचे रक्षण केले तर काही हिंदू बांधवांनी मुस्लिमांच्या मशिदीची व दर्ग्याचे रक्षण करून जातीय सलोखा जपला आहे. हाच सलोखा खऱ्या अमरावतीची ओळख ठरली आहे.

दंगली नंतरही काही मुस्लीम बांधवांनी हिंदूंच्या मंदिराचे रक्षण केले तर काही हिंदू बांधवांनी मुस्लिमांच्या मशिदीची व दर्ग्याचे रक्षण करून जातीय सलोखा जपला आहे. शहरातील हबीब नगर हा शंभर टक्के मुस्लिम बहुल भाग. याच हबीब नगरात (habib nagar amravati) रिजवान भाई यांच्या खाजगी जागेत गेल्या शंभर वर्षापासून शिवमंदिर स्थापित झाले आहे मात्र त्यांचे खासगी जागेत शिव मंदिर असले तरीही ते या मंदिराची काळजी घेतात.

शहरात झालेल्या 13 तारखेच्या हिंसाचारानंतर अनेक मुस्लीम समुदायातील आक्रमक तरुणांनी आपला मोर्चा या मुस्लिम बहुल भागात असलेल्या शिव मंदिराकडे वळवला होता. त्यावेळी रिजवान भाई व त्यांच्या आसपास असणाऱ्या 25 ते 30 तरुणांनी या मंदिराचं रक्षण करून मंदिर तोडायला आलेल्या टोळक्याला हाकलून लावलं. रात्री बेरात्री कोणी येऊ नये म्हणून या मंदिरा भोवती लोखंडी जाळीचे कुंपण घातले, 20 ते 25 नागरिक आळीपाळीने 24 तास या मंदिराचं रक्षण करत आहे. हबीब नगर सोबतच याच मुस्लिम भागात असलेल्या दोन अन्य हिंदू मंदिरांचं देखील संरक्षण मुस्लिम बांधव करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here