ETG Survey: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून या पक्षाला मिळणार सर्वाधिक जागा

0

मुंबई,दि.10: ETG Survey: लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात देशभरातील राजकीय पक्ष खूप सक्रिय दिसत आहेत. राजकीय गोंधळात सर्वच पक्ष आपापले दावे करत आहेत. प्रत्येक पक्षाचे नेते आपल्या विजयाची बढाई मारत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक खुलासे झाले आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला आघाडी मिळू शकते, असे संकेत या सर्वेक्षणातून मिळाले आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच कायम आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईटीजी रिसर्चनं केलेल्या सर्व्हेक्षणातून अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेला भाजप ४८ पैकी २७ ते ३१ जागा जिंकू शकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, काँग्रेसशिवाय इंडिया आघाडीत समाविष्ट इतर पक्षांना 8 ते 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत.

महाराष्ट्रात भाजपा आणि मित्रपक्षांना किती जागा | ETG Survey

टाइम्स नाऊ ईटीजीने लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसंदर्भात जाहीर झालेल्या या सर्वेक्षणात भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपला 27 ते 31 जागा मिळू शकतात असे सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला 4-6 जागा मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला 1-3 जागा मिळण्याची शक्यता आहे.

इंडिया आघाडीला किती जागा?

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीसंदर्भातील सर्वेक्षणात इंडिया आघाडी या पक्षांची आकडेवारीही जाहीर करण्यात आली आहे. सर्वेक्षणानुसार काँग्रेस खूपच मागे आहे. काँग्रेसला शून्य ते 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला 7 ते 9 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, सर्वेक्षणात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला 1-3 जागा मिळू शकतात. यासोबतच महाराष्ट्रातील इतर पक्षांना शून्य ते 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here