Emergency Alert Message: चाचणी इशाऱ्यासाठीचा मेसेज तुम्हालाही आला का?

0

सोलापूर,दि.20: Emergency Alert Message: चाचणी इशाऱ्यासाठीचा मेसेज अनेकांच्या मोबाईलवर आला आहे. अनेकांच्या मोबाईलवर फ्लॅश मेसेज आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना सूचित करण्यात यावे यासाठी याचे प्रात्यक्षिक या मेसेजद्वारे करण्यात आले आहे. याची पूर्वकल्पना नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी जीवितहानी झाली आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी (Irshalgad) इथं पावसामुळे दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

काय आहे मेसेजमध्ये? | Emergency Alert Message

Emergency alert: Severe This is a test alert from Department of Telecommunication, Government of India. 20-07-2023. 10:20 AM OK अशाप्रकारचा मेसेज अनेकांच्या मोबाईलवर आला आहे.

महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे लोकमताशी बोलताना म्हणाले, “अतिवृष्टीचा इशारा देण्यासाठी हा पॉपअप तयार करण्यात आला आहे. सर्व टेलिकॉम कंपनीतर्फे हा मेसेज करण्यात येतो आहे. काळजी करण्याचे किंवा घाबरून जाण्याचे कारण नाही.” असे स्पष्टीकरण दिले आहे.

त्यामुळे ही संकल्पना नागरिकांच्या हितासाठीच अमलात आणण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जीवित हानीचा धोका वाढत चालला आहे. नागरिकांना अतिवृष्टी किंवा पूरपरिस्थिती याची पूर्वकल्पना देण्यासाठी ही चाचणी करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र सायबर विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here