elephant viral video: हत्तीचं पिल्लू नदीत वाहून चाललं होत, आईने वाचवलं

0

दि.17: elephant viral video: सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Viral) होतात. सोशल मीडियावर दररोज काही ना काही तरी व्हायरल होत असते. अनेक व्हिडिओ प्रेरणादायी असतात. हत्तींशी (elephant) संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हत्ती (elephant) हा अतिशय शांत प्राणी असल्याने इंटरनेट युजर्सना त्यांच्याशी संबंधित व्हिडिओ बघायला अत्यंत आवडते. सध्या हत्तीशी संबंधित असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत, नदिच्या प्रवाहात हत्तीचे एक पिल्लू वाहून जाताना दिसत आहे. यावेळी त्याची  आई त्याला ज्या पद्धतीने वाचवते, ते पाहून तुम्हीही सॅल्यूट कराल.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत पाहू शकता, की हत्तींचा एक कळप नदी ओलांडून जात आहे. या दरम्यान मोठे हत्ती अत्यंत सहज ही नदी ओलांडून जातात. मात्र, याच वेळी नदीचा प्रवाह अधिक असल्याने हत्तीचे एक पिल्लू वाहून जाऊ लागते. यावेळी, हे पाहून त्याची आई त्याच्या मागे धावते आणि त्याला वाचविण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात आणखी एक हत्ती येतो आणि दोघे मिळून या पिल्लाला बाहेर काडतात. महत्वाचे म्हणजे, पाण्याचा प्रवाह एवढा अधिक होता की, हे पिल्लू या प्रवाहात बरेच दूरवर वाहत गेले होते.

आईचं प्रेम

या व्हिडिओने युजर्सची मनं जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये आईचे प्रेम आणि हत्तींची एकी पाहून युजर्स इंप्रेस झाले आहेत. हा व्हिडिओ elephants_.world नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. तसेच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत तब्बल 15 लाख हून अधिक लोकांनी पाहिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here