मुंबई,दि.1: महावितरणच्या वीजग्राहकांना वीजदरवाढीचा ‘शॉक’ बसणार आहे. महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना अजून महागाईच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. गेल्या वर्षी राज्य वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, महावितरणच्या वीजबिलात सरासरी साडेसात टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही 10 टक्के दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे.
उन्हाळ्यात अगोदरच उन्हाने हैराण असणाऱ्यांना वीज दरवाढीमुळे अजून हैराण व्हावे लागणार आहे. महावितरणच्या वीजग्राहकांना 1 एप्रिलपासून वीजदरवाढीचा ‘शॉक’ बसणार आहे. परिणामी वीजबिलात किमान पन्नास रुपयांची वाढ होणार आहे. दैनिक लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.
दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार देशात राज्यातील विजेचे दर सर्वाधिक आहेत. सर्वाधिक दर असूनही गेल्या वर्षी महावितरणने सादर केलेली वीजदरवाढीची याचिका राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केली. त्यामुळे दरवाढ होणार आहे.
वीजवापर (युनिट्स) जुने दर नवे दर
0 ते 100 5.58 रुपये 5.88 रुपये
101 ते 300 10.81 रुपये 11.46 रुपये
301 ते 500 14.78 रुपये 15.72 रुपये
501 ते 1000 16.74 रुपये 17.81 रुपये