मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मोठ्या घोषणा; शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान

0

मुंबई,दि.२७: राज्य सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट ५० हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. नियमित कृषी कर्ज फेडणाऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना प्रति युनिट १ रुपयांची वीज सवलत देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

अनुदान योजनेचा ५० हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच कर्जफेडीची मुदत तीन वर्षांची मुदत दोन वर्षांवर आणली आहे. हजारो एकर जमीन ओलिताखाली आणण्यात येणार आहे, असे शिंदे म्हणाले. 

याचबरोबर भातसा धरणासाठी १५५० कोटींची मान्यता देण्यात आली आहे. लोणार सरोवर विकासासाठी ३७० कोटी देण्यात येणार असल्याचे शिंदे म्हणाले. आज शिंदे सरकारची मंत्रिमंडळ बैठक होती. 

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

राज्यात वीज वितरण यंत्रणा सुधारणार. ग्राहकांना स्मार्ट व प्रिपेड मीटर्स. 
महावितरण व बेस्ट उपक्रमामार्फत सुधारित वितरण क्षेत्र योजना-सुधारणा अधिष्ठित आणि निष्पत्ती-आधारित योजना.

ऊर्जा विभाग

अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना  वीज दरात सवलत देणार. 

(उर्जा विभाग)

•     दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती 

 (विधि व न्याय विभाग)

•    विधि व न्याय विभागात सह सचिव (विधि) (गट-अ) पद नव्याने निर्माण करणार


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here