शिवसेनेवर दावा सांगण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी घेतला हा निर्णय

0

नवी दिल्ली,दि.19: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार आहेत. यांनतर एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावे म्हणून निवडणूक आयोगाकडे गेला आहे. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.

शिवसेना कोणाची हा निर्णय आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांची निवडणूक आयोगासमोर ओळख परेड करणार आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे येणार आहेत. शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं याबाबत निवडणूक आयोगात ठाकरे-शिंदे गटात वाद सुरू आहे. निवडणूक आयोगासमोर जाऊन एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेले आमदार दाखवणार आहेत. हे आमदार दाखवून एकनाथ शिंदे शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर आपला हक्क असल्याचं सांगणार आहेत.

हे सगळे आमदार आम्ही स्वमर्जीने एकनाथ शिंदेंसोबत आहोत, अशाप्रकारचं शपथपत्र निवडणूक आयोगाला सादर करू शकतात. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रश्न विचारायचे असतील तर ते याबाबत प्रश्न विचारू शकतात. याआधी एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत असलेल्या आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांचं शपथपत्र निवडणूक आयोगाला दिलं आहे.

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? यावरून सध्या निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचा वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने यासाठी घटनापीठाचीही स्थापना केली आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना एकनाथ शिंदे यांनी आमदारांची ओळख परेड करण्याची रणनिती आखली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here