Eknath Shinde Update: जगभरात एकनाथ शिंदेंची चर्चा सुरु, जो बायडेन, पुतीन,मोदींनाही टाकले मागे

0

दि.25: Eknath Shinde Update: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. भारतासह जगाचे लक्ष हे महाराष्ट्राकडे आहे. आणि याचे कारण आहे एकनाथ शिंदे… शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाला सध्या जगभरातून सर्च केले जात आहे. एकनाथ शिंदे हे नेमके कोण आहे? याची उत्सुकता जगभरातील नागरिकांमध्ये आहे. विशेष म्हणजे विकिपीडियावर एकनाथ शिंदे हे सध्या मोदी, बायडेन तसेच पुतीन पेक्षा जास्त प्रसिद्ध आहे.

जगातील कोणत्याही गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया हा आता परवलीचा शब्द निर्माण झाला आहे. विकिपीडिया हा जगात सर्वात जास्त वापरला जाणारा विश्वकोश आहे. महाराष्ट्रातील राजकारणाचे पडसाद हे गूगल नंतर विकिपीडियावर देखील दिसत आहेत. जो बायडन यांच्या बद्दलचा विकिपीडियाचा लेख हा 1,27,104 लोकांकडून वाचला गेला तर एकनाथ शिंदे यांचा लेख 3,35, 060 लोकांनी वाचला. विकिपीडियाच्या अभिषेक सूर्यवंशी यांनी या माहितीस दुजोरा दिला व एकनाथ शिंदे यांचे विकिपीडिया आर्टिकल सध्या राजकीय क्षेत्रात सर्वात जास्त वाचले जात आहे असे सांगितले.

महाराष्ट्रातील राजकीय चर्चा राज्यात देशातच नाही तर जगभरात देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. 33 देशांमध्ये तीन दिवसांत पाच नेत्यांविषयी माहिती सर्वाधिक सर्च करण्यात आली. त्यात एकनाथ शिंदे सर्वात पुढे हाते. शिंदेंविषयी माहिती सर्च करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानात 54 टक्के, सौदी अरेबियात 57 टक्के, मलेशिया 61 टक्के, नेपाळ 51 टक्के, बांगलादेश 42 टक्के, थायलंड 54 टक्के, जपान 59 टक्के, कॅनडात 55 टक्के लोकांनी सर्च केले. दरम्यान भारतात एकनाथ शिंदे यांची जात कोणती आहे? याबाबत देखील खूप जास्त प्रमाणात सर्च केलं जात आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here