Video: एकनाथ शिंदे यांनाही शहाजीबापू पाटील यांच्या ‘झाडी, डोंगार, हाटील’ ची भुरळ

0

दि.28: Video: काय झाडी…काय डोंगर..काय हाटील..एकदम ओकेच..असं म्हणणारे शिवसेनेेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) चांगलेच चर्चेत आले आहे. सध्या महाराष्ट्रात शहाजीबापू चांगलेच चर्चेत आहेत. शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यामुळे राज्यात एकीकडे आरोप-प्रत्यारोप होत असताना सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहेत. शहाजीबापू पाटील यांनी कार्यकर्त्यासोबत संवाद साधताना म्हटलेलं एक वाक्य सध्या तुफान व्हायरल झालं आहे. शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल” वाक्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली असून यावर चक्क गाणंही आलं आहे. बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंनाही या वाक्याची भुरळ पडली आहे.

शिवसेनेचे एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातले वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे तणावपूर्ण वातावरण आहे, पण अशातच आमदार कशी मजा करतायत हे शिवसेनेचे सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी हे पटवून दिलं. शहाजीबापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे.

मंगळवारी सकाळी सर्व आमदार गुवाहाटीमधील हॉटेलच्या लॉबीत आले असता शहाजीबापू पाटील यांचं कौतुक कऱण्यास सुरुवात केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापूंना ते सुपरहिट वाक्य पुन्हा एकदा म्हणून दाखवण्याची विनंती केली. यावर शहाजीबापूंनी ते वाक्य म्हणून दाखवताच उपस्थित आमदारांमध्ये एकच हशा पिकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here