नवी दिल्ली,दि.11:एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde Group) ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगाने नाव दिले आहे. शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले होते. उद्धव ठाकरे गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्य वतीनं काल निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता.
एकनाथ शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने याबाबचा निर्णय दिलाय. काल ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नवे तीन पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला तीन पर्या देण्यात आले होते. त्यातून त्यांना ढाल-तलवार चिन्ह देण्यात आलंय.
शिंदे गटाने उगवता सूर्य, त्रिशूळ आणि गदा या चिन्हांचा पर्याय देण्यात आला होता. पहिल्या दोन चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने आधीच भूमिका स्पष्ट केली. तर गदा हे चिन्ह धार्मिक चिन्ह असल्याने ते देता येणार नाही असं सांगत शिंदे गटाने तीन नव्या चिन्हांचा पर्याय द्यावा असं सांगितलं होते.