Eknath Shinde On Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना दिले जोरदार प्रत्युत्तर

0

मुंबई,दि.५: Eknath Shinde On Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महिला पदाधिकाऱ्यांसाठी मेळावा घेतला, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता टिका केली. उद्धव ठाकरेंनीही महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी, एकनाथ शिंदेंवर जबरी टिका केली. ”काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. तसेच, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील माहिती नाही, असा खोचक टोमणाही त्यांनी मारला. 

उद्धव ठाकरेंनी नाव न घेता केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला” असं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!” असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच  MaharashtraFirst हा हॅशटॅग देखील वापरला आहे. 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडत धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे ४० आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असणाऱ्या अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे चांगले आहेत, मात्र आजूबाजूला असणारी मंडळी उद्धव ठाकरे यांना चुकीचा सल्ला देतात असे म्हटले आहे. अनेक आमदार अजूनही उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत, असेच सांगतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here