Eknath Shinde On Rahul Gandhi: राहुल गांधींना त्या जेलमध्ये ठेवलं पाहिजे आणि घाण्याला जुंपलं पाहिजे: एकनाथ शिंदे

0

मुंबई,दि.25: Eknath Shinde On Rahul Gandhi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. मानहानीचा दाव्यात सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली. राहुल गांधी यांनी माफी मागितली असती, तर ही वेळ आली नसती, असं भाजपाच्यावतीने सांगण्यात आले. राहुल गांधी यांनी माझं नाव सावरकर नाही, तर गांधी आहे आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाही, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी मोदी सरकावर निशाणा साधला.

एकनाथ शिंदे यांची राहुल गांधींवर टीका | Eknath Shinde On Rahul Gandhi

‘सावरकर हे देशाचा अभिमान आहे. राहूल गांधी यांना त्या जेलमध्ये ठेवलं पाहिजे आणि त्या घाण्याला जुंपलं पाहिजे. मग त्यांना कळेल. आज ही ते म्हणाले की माफी मागायाला मी सावरकर आहे का? त्यांना याची शिक्षा पाहिजे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये निवेदन दिलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या सावरकर विधानावरून टीका केली.

‘हा कायदा काँग्रेसने केला आहे. त्यानुसार लालू प्रसाद यादव आणि इतर लोकांवर यांची कारवाई झाली. त्यावेळी कोणी निदर्शने केली नाही. त्यावेळी कोणी म्हणाले नाही की लोकशाही धोक्यात आहे. त्यावेळी राहुल गांधी यांनी अध्यादेश फाडला होता. लोकसभेने ती कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही. रस्तावर फिरु देणार नाही. ओबीसी समाजाचा अवमान केल्यामुळे त्याचा जाहीर निषेध करतो, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवरील कारवाईचं समर्थन करत टीका केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here