मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे थेट आव्हान; तर मी राजकारण सोडून निघून जाईन

0

मुंबई,दि.15: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या नेत्यांना थेट आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार गेले आहेत.

उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायऊतार व्हावे लागल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातोय. शिवसेनेच्या याच दाव्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाष्य केले आहे. एकही आमदार पडणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही माणूस पराभूत झाला तर मी राजकारण सोडून निघून जाईल, असे मी याआधीच सांगितले आहे; असे शिंदे यांनी जाहीर सभेत सांगितले आहे.

एकही आमदार पडणार नाही

“बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असे म्हटले जात आहे. पण मी म्हणतो एकही आमदार पडणार नाही. याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही माणूस पराभूत झाला, तर मी राजकारण सोडून निघून जाईल; असे मी तेव्हाच जाहीरपणे सांगितले आहे,” असे भाष्य एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच पुढे बोलताना कोण जिंकणार कोण पराभूत होणार हे ठरवणारे तुम्ही कोण आहात? हे सगळं जनता ठरवत असते. मतदार ठरवत असतात, अशी खोचक टीकादेखील शिंदे यांनी केली.

आमचा यामध्ये स्वार्थ नाही

“आम्ही घेतलेली भूमिका सामान्यांना न्याय देणारी आहे. आमची भूमिका सर्वसामान्य लोकांना पटणारी आहे. मला आठवत आहे. मी दिल्लीहून पुण्याला उतरलो. नंतर पंढरपूरला निघालो. पुण्याच्या रस्त्याला दुतर्फा हजारो लोक स्वागतासाठी उभे होते. पंढरपुरात दहा लाखांपेक्षाही जास्त गर्दी होती. सुरक्षेच्या कारणामुळे तुम्ही गाडीच्या बाहेर येऊ नका, असे मला पोलिसांनी सांगितले. मी गाडीच्या बाहेर आलो. सर्वांना अभिवादन करत होतो. वारकही हेच माझे रक्षक आहेत, असे मी तेव्हा पोलिसांनी सांगितले. मारणाऱ्यांपेक्षा वाचवणारा मोठा असतो,” असे म्हणत सध्या स्थापन झालेल्या शिंदे गट-भाजपाच्या सरकारला लोकांचा पाठिंबा आहे, असा दावा शिंदे यांनी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here