Eknath Shinde Sharad Pawar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट?

0

मुंबई,दि.६: Eknath Shinde Sharad Pawar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) राष्ट्रवादीचे शरद पवारांची भेट घेतली असल्याचे वृत्त (Eknath Shinde Meets Sharad Pawar) समाज माध्यमांवर आले होते. शरद पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपा व एकनाथ शिंदे गटाचे सरकार लवकरच कोसळेल आणि विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असे भाकीत केले होते. मात्र अशाप्रकारची कोणतीही भेट झाली नसल्याचे एकनाथ शिंदे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे ४ जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर दिलेल्या भाषणामध्ये त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची आपण भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. याचीच सुरुवात त्यांनी शरद पवारांपासून केल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांच्या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. मागील दोन दिवसांपासून मुंबईत सतत कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शिंदे हे सकाळीच मुंबई महानगरपालिकेमधील आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते दिवसभर मुंबईमध्येच होते.

एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असणाऱ्या आमदारांनी राष्ट्रवादीमुळे शिवसेनेच्या आमदारांवर आणि नेत्यांवर अन्याय होत असल्याचे आरोप केले होते. राष्ट्रवादीबरोबर सत्तेतून बाहेर पडण्याची अनेक आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती. राष्ट्रवादी शिवसेना संपवण्याचे काम करत आहे असे अनेक आमदारांनी म्हटले होते.

शरद पवार यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपा व एकनाथ शिंदे गटाचे सरकार लवकरच कोसळेल आणि विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असे भाकीत केले होते. याकडे लक्ष वेधण्यात आले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी, आमची हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून नैसर्गिक युती आहे. या सरकारला अडीच वर्षे कोणताही धोका नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलदार व मोठ्या मनाचे आहेत. त्यामुळे मला मुख्यमंत्री पद मिळाले. आमच्यामध्ये चांगला समन्वय असून मतभेद होणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपचे  अध्यक्ष जे.पी. नड्डा हे आमच्या सरकारमागे भक्कमपणे उभे असल्याने सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केलेला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here