लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य 

0

कोल्हापूर,दि.5: लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कोल्हापूरमधील शिरोळ येथील प्रचारसभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले असल्याची टीका केली. ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या योगदान व शुभेच्छावर जिंकणार आहे असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

लाडक्या बहिणीना पैसे दिले, यात आम्ही काय पाप केलं? अशी विचारणाही त्यांनी केली. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांचा खात्यात डिसेंबरमध्ये जमा होतील. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या योगदान व शुभेच्छांवर जिंकणार आहे. लाडकी बहीण सुपरहिट झाली आहे. असे शिंदे म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here