Eknath Shinde: निवडणूक आयोगाकडे एकनाथ शिंदे यांनी दिली पक्षासाठी तीन नावं

0

मुंबई,दि.10: Eknath Shinde: निवडणूक आयोगाकडे एकनाथ शिंदे यांनी पक्षासाठी तीन नावं दिली आहेत. शिंदे गटाने पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे तीन नावांचा पर्याय दिला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या तिन्ही नावांमध्ये बाळासाहेब यांचा उल्लेख आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना हे मुख्य नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर पर्यायी नावांचा प्रस्ताव सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज दुपारी एक वाजेपर्यंतची मुदत ठाकरे आणि शिंदे गटाला दिली होती.

निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला आहे. त्यामुळे शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोग रद्द करण्याची अधिक शक्यता आहे. शिंदे गटाने बंड केल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता. त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले आहे. आता, निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

चिन्हांसाठी सुचवले हे पर्याय

ठाकरे आणि शिंदे गटात डाव-प्रतिडाव रचला जात आहे. ठाकरे गटाने पर्यायी तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला होता. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हा पर्याय दिला आहे. तर, शिंदे गटानेदेखील उगवता सूर्य आणि त्रिशुळ या चिन्हांचा पर्याय दिला आहे. शिंदे गटाने ‘गदा’ या चिन्हाचा तिसरा पर्याय दिला आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडून तीन चिन्हांचा पर्याय

शिवसेना ठाकरे गटांकडून निवडणूक आयोगाला तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय देण्यात आला. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. तर, पक्षाच्या नावांसाठी शिवसेना-बाळासाहेब ठाकरे, शिवसेना-बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पर्याय देण्यात आले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here